दुचाकीहून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:49+5:302021-05-01T04:18:49+5:30

इरफान आयुब पठाण (वय २४, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व आलिया नसीम सय्यद (वय २६, रा. लखमीपुरा, संगमनेर) अशी ...

Death of two traveling by bike | दुचाकीहून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू

दुचाकीहून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू

इरफान आयुब पठाण (वय २४, रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) व आलिया नसीम सय्यद (वय २६, रा. लखमीपुरा, संगमनेर) अशी या अपघातातील मयतांची नावे आहेत. रमजान आयुब पठाण (रा. राजीव गांधी नगर, घुलेवाडी. ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

इरफान पठाण व आलिया सय्यद हे दोघे दुचाकीहून (एमएच १७, बीए ८८६८) प्रवास करत होते. त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने ते दोघेही पडले. त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचे निधन झाले. काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुचाकीला धडक बसलेल्या अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Death of two traveling by bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.