शेवगाव हत्याकांडातील जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या तीनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 13:30 IST2017-07-18T13:30:28+5:302017-07-18T13:30:28+5:30
शेवगाव शहरातील दुहेरी हत्याकांडातील गंभीर जखमी बाळू रमेश केसभट याचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला़.

शेवगाव हत्याकांडातील जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या तीनवर
लोकमत आॅनलाइन
शेवगाव : शेवगाव शहरातील दुहेरी हत्याकांडातील गंभीर जखमी बाळू रमेश केसभट याचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला़. केसभट याच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते़ या हत्याकांडात आता मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली असून, पोलीसांसमोर घटनेची उकल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे़
शेवगाव शहरालगत आखेगाव रस्ता व जुना सालवडगाव रस्त्याच्या मध्यभागी निर्जन ठिकाणी रविवारी रात्री दीपक रामनाथ गोर्डे ( वय ३५, रा. धनगरगल्ली, शेवगाव) व मंगल अनिल अळकुटे ( वय ३२ रा. दहिगावने, ता. शेवगाव) यांची हत्या झाली होती़ या घटनेत बाळू केसभट हा गंभीर जखमी झाला होता़ त्याला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते़ त्याचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या हत्याकांडाचे रहस्य कायम राहिले आहे़ पोलीसांसमोर आता आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे़ दरम्यान हे तिहेरी हत्याकांड नाजूक कारणातून घडले असल्याची चर्चा शेवगाव परिसरात आहेत़