कपडे खरेदीसाठी गेलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: March 9, 2017 23:26 IST2017-03-09T23:26:56+5:302017-03-09T23:26:56+5:30

कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील दोन तरूण चडचण (कर्नाटक) येथून कपडे घेऊन रवळगाव

Death toll collapses to buy clothes | कपडे खरेदीसाठी गेलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू

कपडे खरेदीसाठी गेलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
मिरजगाव ( जि. अहमदनगर), दि. 9 -  कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील दोन तरूण चडचण (कर्नाटक) येथून कपडे घेऊन रवळगावकडे परतत असताना झालेल्या अपघाकात ठार झाले. चडचण-मंगळवेढा मार्गावर हा अपघात सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. 
या अपघातात दिलीप लक्ष्मण खेडकर  (वय -40)व अतूल आण्णा शेळके  (वय-27, रवळगाव तालुका कर्जत, जिल्हा. अहमदनगर)  हे ठार झाले. गुरुवारी सकाळी रवळगाव येथून हे दोन तरूण मोटारसायकल (क्रमांक MH-16 A 6177 )सोलापूर कर्नाटक सीमेवर स्वस्तातील कपड्यांसाठी प्रसिध्द असलेल्या चडचण येथे गेले होते. या ठिकाणीची खरेदी उरकून रवळगावकडे परतत असताना चडचण-मंगळवेढा मार्गावर पुढे चाललेल्या ट्रकला ओव्हरटेक करत असताना समोरून येणा-या ट्रकने (क्रमांक KA -35  B- 3964) जोरदार धडक दिली. या धडकेने मोटारसायकलने पेट घेतला. या अपघातात हे दोन्हीही तरूण जागीच ठार झाले. त्यांच्या जवळील मोबाईलवरून मंगळवेढा पोलीसांनी नातेवाईकांशी संपर्क केला असून नातेवाईक अपघात स्थळाकडे रवाना झाले आहेत.

Web Title: Death toll collapses to buy clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.