रिक्षा-पिकअप अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:47 IST2018-08-06T14:47:04+5:302018-08-06T14:47:08+5:30
निंबळक : नगर-कल्याण महामार्गावरील हिंगणगाव फाटा येथे पॅगो रिक्षा व पिकअप यांच्यात अपघात होऊन तेरा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू ...

रिक्षा-पिकअप अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू
निंबळक : नगर-कल्याण महामार्गावरील हिंगणगाव फाटा येथे पॅगो रिक्षा व पिकअप यांच्यात अपघात होऊन तेरा वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. रविवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली.
सुयश अनिल ज-हाड असे अपघातात मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. भास्कर ज-हाड, कौसाबाई ज-हाड व मनिषा ज-हाड यांच्यासह पाच वर्षाची मुलगी जखमी झाली. निंबळक येथील अनिल ज-हाड याचे कुंटुब टाकळीखातगाव येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास पॅगो रिक्षातून निंबळक येथे घरी येत असताना हिंगणगाव फाटा येथील सोनवणे पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या रिक्षाला पाठीमागून येणाऱ्या पिकअपची धडक बसली. यावेळी रिक्षा रस्त्याच्या कडेला असणा-या पुलाच्या कठाड्यावर जाऊन आदळली. सुयश याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुयश हा येथील माध्यमिक विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता.