खारेकर्जुने येथील सैनिकाचा अपघातात मृत्यू
By Admin | Updated: June 14, 2016 23:22 IST2016-06-14T23:15:03+5:302016-06-14T23:22:46+5:30
अहमदनगर : दिल्ली येथे भारतीय सेनेत सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील योगेश रामदास गारगुंड (वय ३०) यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला़

खारेकर्जुने येथील सैनिकाचा अपघातात मृत्यू
अहमदनगर : दिल्ली येथे भारतीय सेनेत सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या नगर तालुक्यातील खारेकर्जुने येथील योगेश रामदास गारगुंड (वय ३०) यांचा वाहन अपघातात मृत्यू झाला़ त्यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़
खारेकर्जुने येथील जवान योगेश गारगुंड गेल्या १२ वर्षांपासून सेनेत कार्यरत आहेत़ सध्या त्यांची दिल्ली येथे नियुक्ती होती़ ते नेहमीप्रमाणे कामावर जात असताना पाच दिवसांपूर्वी अपघातात जखमी झाले़ त्यांना दिल्ली येथील आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली़
गारगुंड यांचा मृतदेह विमानाने पुणे येथे आणण्यात येणार आहे़ पुणे येथून आर्मीच्या वाहनातून खारेकर्जुने येथे आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ गारगुंड यांच्यामागे पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे़ या घटनेने खारेकर्जुने गावात शोककळा पसरली आहे़
(प्रतिनिधी)