नगर तालुक्यातील बारदारी तलावात बुडुन एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 15:29 IST
नगर तालुक्यातील चांदबिबी महाल येथे फिरण्यासाठी आलेल्या अहमदनगर येथील एका व्यक्तीचा बारदरी तलावात बुडुन मृत्यु झाला
नगर तालुक्यातील बारदारी तलावात बुडुन एकाचा मृत्यू
चिचोंडी पाटील (अहमदनगर ) : नगर तालुक्यातील चांदबिबी महाल येथे फिरण्यासाठी आलेल्या अहमदनगर येथील एका व्यक्तीचा बारदरी तलावात बुडुन मृत्यु झाला. घटना आज सकाळच्या सुमारास घडली. प्रशांत बाळु डुंबाळे (वय - ४३) असे मृत व्यक्तीचे नाव असुन हे आपल्या सहा मित्रांनसह चांदबिबी महाल येथे फिरण्यासाठी आले होते. पार्टी केल्यानंतर पोहण्यासाठी नजीकच्या बारदरी तलावावर गेले होते. पोहत असताना डंबाळे यांचा तलावात बुडुन मृत्यु झाला. नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास गोविंद गोल्हार हे करत आहेत