छपराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

By Admin | Updated: May 27, 2016 00:02 IST2016-05-26T23:53:40+5:302016-05-27T00:02:22+5:30

राहुरी : राहुरी परिसरात असलेल्या मुलनमाथा येथे गुरूवारी पहाटे अचानक लागलेल्या आगीत आजिनाथ ज्ञानोबा मिसाळ (वय ४१) हे होरपळून जागीच मृत्युमुखी पडले़ त्यांची मुलगी जखमी झाली़

The death of one in the blaze of Chaparra | छपराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

छपराला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

राहुरी : राहुरी परिसरात असलेल्या मुलनमाथा येथे गुरूवारी पहाटे अचानक लागलेल्या आगीत आजिनाथ ज्ञानोबा मिसाळ (वय ४१) हे होरपळून जागीच मृत्युमुखी पडले़ त्यांची मुलगी जखमी झाली़
गुरूवारी पहाटे कुडाच्या छपराला अचानक आग लागली. त्यावेळी आतमध्ये आजिनाथ मिसाळ झोपलेले होते, तर त्यांची विवाहित मुलगी सोनाली मनोज उगलमुगले,तिची आई संगीता व भाऊ बाहेर झोपले होते. आगीच्या धगीमुळे सर्वजण जागे झाले. त्यामुळे ते बचावले. तरीही सोनाली जखमी झाली. परंतु आत झोपलेले आजिनाथ मिसाळ यांचा होरपळून मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ कामगार तलाठी संजय आडोळे यांनी घटनेचा पंचनामा केला़ आगीत ५५ हजार रूपयांचे नुकसान झाले़ नंतर राहुरी नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.

Web Title: The death of one in the blaze of Chaparra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.