अपघातात वृध्दाचा मृत्यू, दुचाकीस्वारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:36 IST2021-02-05T06:36:08+5:302021-02-05T06:36:08+5:30

जामखेड : बीड रोडवरील हापटवाडी जवळ रस्त्याने पायी जाणाऱ्या वृध्दास मोटारसायकलने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ...

Death of an old man in an accident, a crime on a two-wheeler | अपघातात वृध्दाचा मृत्यू, दुचाकीस्वारावर गुन्हा

अपघातात वृध्दाचा मृत्यू, दुचाकीस्वारावर गुन्हा

जामखेड : बीड रोडवरील हापटवाडी जवळ रस्त्याने पायी जाणाऱ्या वृध्दास मोटारसायकलने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुरुवारी (दि. २८) मोटारसायकलस्वारा विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत वृध्द बापू दगडु वाघमारे (वय ७०, वर्षे, रा. मोहा. ता. जामखेड) हे सहा दिवसांपुर्वी २२ जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजता जामखेड येथुन आपल्या मोहा गावी रस्त्याच्या कडेने पायी चालले होते. याच दरम्यान मोटारसायकल (एम.एच. २३, बी. बी. ६५३६) वरुन जाणाऱ्या आरोपी दत्तात्रय पांडुरंग येवले (रा. यवलवाडी. ता. पाटोदा. जि. बीड) याने या वृध्दास मोहा जवळील हापटवाडी येथील लक्ष्मी थेटर जवळ पाठीमागून येऊन जोराने धडक दिली. त्यामुळे या अपघातात वृध्दाचा मुत्यू झाला.

या नंतर गुरुवारी (दि. २८) मयताचा मुलगा सुनील बापु वाघमारे (रा. मोहा) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली के. बी. कोळपे हे करत आहेत.

Web Title: Death of an old man in an accident, a crime on a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.