उसतज्ज्ञ ज्ञानदेव हापसे यांचे निधन - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST2021-09-02T04:45:43+5:302021-09-02T04:45:43+5:30

अहमदनगर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उस तज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे (वय ८२) यांचे रविवारी (दि. २९) पुणे येथे निधन ...

Death of master expert Dnyandev Hapse - A | उसतज्ज्ञ ज्ञानदेव हापसे यांचे निधन - A

उसतज्ज्ञ ज्ञानदेव हापसे यांचे निधन - A

अहमदनगर : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उस तज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे (वय ८२) यांचे रविवारी (दि. २९) पुणे येथे निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. हापसे यांच्यामागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

एकरी १०० टन उस उत्पादन चळवळीचे ते प्रणेते होते. यासाठी त्यांची ‘डॉ. हापसे तंत्रज्ञान’ म्हणून ओळख होती. डॉ. हापसे हे नेवासा बुद्रूक (ता. नेवासा) येथील मूळ रहिवासी होते. ‘कृषी वनस्पती क्रियाशास्त्र’ या विषयात त्यांनी पीएच.डी. मिळविली होती. १९६८ ते १९७५ या काळात त्यांनी गहू संशोधन केंद्र निफाड (जि. नाशिक), कृषी महाविद्यालय धुळे व पुणे येथे प्राध्यापक म्हणून काम केले. उस क्षेत्रातील भीष्माचार्य हरपला, अशा शब्दात कृषीतज्ज्ञांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हापसे यांच्या निधनाने ऊस उत्पादक शेतकरी, कृषी विद्यापीठ परिवार, ऊस संस्था आणि साखर उद्योगात हळहळ व्यक्त करण्यात आली.

--

फोटो- ३०ज्ञानदेव हापसे

Web Title: Death of master expert Dnyandev Hapse - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.