शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

हळगाव येथील श्रीराम कारखान्यात उकळत्या पाकात पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 13:21 IST

श्रीराम शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्टस् (हळगाव, ता. जामखेड) या कारखान्यात काम करणारा मजूर विनोद अंकुश मोरे (वय १९) हा उकळत्या पाकात पडून जागीच मृत्यू पावला. ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता घडली.

जामखेड : श्रीराम शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्टस् (हळगाव, ता. जामखेड) या कारखान्यात काम करणारा मजूर विनोद अंकुश मोरे (वय १९) हा उकळत्या पाकात पडून जागीच मृत्यू पावला. ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता घडली.तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम शुगर अँड अ‍ॅग्रो प्रोडक्ट्स या साखर कारखान्यात १२ नोव्हेंबर २०१७ पासून उत्पादन विभागात हेल्पर म्हणून नोकरीस असलेला विनोद अंकुश मोरे (वय १९, रा. गांधनवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) हा शुक्रवारी रात्रपाळीला काम करीत होता. रात्री दीडच्या सुमारास हा कारखान्यातील ग्राऊंड फ्लोअर असलेल्या उकळत्या साखरेच्या पाकाशेजारी (सेन्ट्रीफ्युगन टब) एकटाच काम करीत होता. तर बाकीचे सहकारी वरच्या मजल्यावर दुरूस्तीसाठी गेले होते. त्याचवेळी कामगार विनोद मोरे हा उकळत्या पाकाच्या टबमध्ये पडला. याचा आवाज वरच्या मजल्यावरील कामगारांना आल्याने त्यांनी ताबडतोब मशिनरी बंद केली व टबमध्ये गंभीर अवस्थेत जखमी पडलेल्या विनोद मोरे यास बाहेर काढले. त्याला जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तोपर्यंत विनोद गतप्राण झाला होता. यावेळी कारखाना प्रशासनाने सदर साखरेचा पाक असलेला टब धुवून काढून कारखाना पुन्हा चालू केला.विनोद मोरे मृत्यू पावल्याची खबर कारखाना जनरल मॅनेजर एस़ जे़ गाढवे यांना मिळाली. त्यांनी ताबडतोब कारखान्यात काम करणारे मयत विनोद याचे मेव्हणे शिवाजी झांबरे यांना कळवले. त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. तोपर्यंत मृतदेह दवाखान्यातच होता. आज सकाळी मयत विनोदचे आई, वडील आले. दुपारी शवविच्छेदन करण्यात आले़ त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गांधनवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडSugar factoryसाखर कारखाने