मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 15:26 IST2019-06-05T15:25:22+5:302019-06-05T15:26:24+5:30
शहरातील पुणे बसस्थानक परिसरात दीड महिन्यापूर्वी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी (दि़४) सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़

मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू
अहमदनगर : शहरातील पुणे बसस्थानक परिसरात दीड महिन्यापूर्वी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी (दि़४) सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ किरण उर्फ प्रेम उद्धव जगताप (वय १९रा़ बोहरीचाळ स्टेशन रोड, नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे़
दीड महिन्यापूर्वी किरण याला पुण्याला जायचे होते़ यासाठी तो पुणे बसस्थानकाता आला होता़ तेथे किरकोळ कारणातून काही तरुणांनी त्याला जबर मारहाण केली़ या घटनेत किरण याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती़ या घटनेनंतर किरण याला येथील आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात किरणच्या नातेवाईकांनी फिर्याद दाखल केली होती़ किरण याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना तो मयत झाला़ किरणच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला़
घटनेला एक महिना उलटूनही पोलिसांनी या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक केली नाही़ त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची बदली करावी, अशी मागणी केली़
शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला तेव्हा तेथे नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती़ यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला
होता़ मयत किरण याचे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयातून मृतदेह औरंगाबाद येथे पाठविण्यात आला़
या घटनेप्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी
सामाजिक कार्यकर्ते निलेश बांगरे यांनी केली़