वीज धक्क्याने बालिकेचा मृत्यू

By Admin | Updated: August 30, 2014 23:20 IST2014-08-30T23:10:49+5:302014-08-30T23:20:54+5:30

जामखेड : शेतजमिनीवरील वीज वाहक तारेला चिटकून पाच वर्षाच्या मुलीला नाहक जीव गमवावा लागल्याची घटना तालुक्यातील राजुरी येथे घडली.

Death of the child by electricity shock | वीज धक्क्याने बालिकेचा मृत्यू

वीज धक्क्याने बालिकेचा मृत्यू

जामखेड : शेतजमिनीवरील वीज वाहक तारेला चिटकून पाच वर्षाच्या मुलीला नाहक जीव गमवावा लागल्याची घटना तालुक्यातील राजुरी येथे घडली.
प्रिती चंद्रकांत काळदाते हे मृत मुलीचे नाव आहे. राजुरी येथे दोन महिन्यापूर्वी जोरदार वादळ होऊन गाव परिसरातील काही वीज खांब वाकल्याने वीजवाहक तारा जमिनीवर लोंबळकत होत्या. गामस्थांनी याकडे ‘महावितरण’चे लक्ष वेधून नवीन खांब बसविण्याची मागणी केली होती.
राजुरी येथील काळदाते मळा परिसरात रहाणारी प्रिती शेतात खेळत असताना तिचा पाय या वीजवाहक तारेला लागला. व तारेला चिटकून तिचा अंत झाला. जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्रिती हिचे शवविच्छेदन करण्यात आले.
जामखेडचे तहसीलदार प्रदीप कुलकर्णी, पोलीस निरीक्षक शशिकांत वाखारे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रा. मधुकर राळेभात, सभापती डॉ. भगवान मुरुमकर, संजय कोठारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Death of the child by electricity shock