शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 22:49 IST

महापालिका निवडणुकीतील राजकीय वादातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला.

अहमदनगर: महापालिका निवडणुकीतील राजकीय वादातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील कापड बाजारातील मोची गल्ली येथे ही घटना घडली. सेनेच्या महापौर सुरेखा कदम व भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या सुनबाई दीप्ती गांधी यांच्यात या प्रभागात लढत होत असून पैसे वाटपातून हे वाद झाले होते. या हल्ल्यात सागर विष्णू थोरात (वय २७) हा सेनेचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येथील आनंदऋषी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रभाग क्रमांक बारामध्ये मतदारांना पैसे वाटण्याच्या कारणातून शनिवारी सायंकाळी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. याच वादातून सागर थोरात याच्यावर रात्री नऊच्या सुमारास दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये सागरच्या छातील व डोक्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथून खासगी रूग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

भाजपचे कार्यकर्ते माळीवाडा परिसरात मतदारांना पैसे वाटत होते. सागर थोरात यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते गुंडांना बरोबर घेऊन राजरोस पैसे वाटप करत असताना प्रशासन काहीच कारवाई करत नाही. भाजपचे सुवेंद्र गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते दहशत निर्माण करत आहेत. - संभाजी कदम, माजी शहर प्रमुख, शिवसेना

हल्ल्यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही. घटना घडली तेव्हा मी व भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नव्हतो. पोलीस प्रशासनाने दिलेला अंगरक्षक माझ्यासोबत होता. पोलीस त्यांनाही विचारू शकतात. उलट शिवसेनेचे कार्यकर्तेच भाजपच्या कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी दमदाटी करत आहेत. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. सत्य काय आहे ते बाहेर येईल.-सुवेंद्र गांधी, नगरसेवक, भाजप (खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा)

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाElectionनिवडणूक 2024Muncipal Corporationनगर पालिका