पारनेर तालुक्यात आढळला मृत बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:08 IST2018-06-14T15:59:07+5:302018-06-14T16:08:36+5:30
पारनेर तालुक्यातील जवळे येथे मृत अवस्थेत बिबट्या आढळला.

पारनेर तालुक्यात आढळला मृत बिबट्या
जवळे (पारनेर): तालुक्यातील जवळे येथील सालके पाटील मळ्यात डाळिंबाच्या शेताच्या बांधा लगत असणा-या ओढ्यात बिबट्या मृत आढळून आला.
जवळे येथील कुकडी डाव्या कालव्याच्या शेजारी राहणारे बबनराव सालके यांच्या घराच्या शेजारीच असणा-या डाळिंबाच्या बागेत शेत मजूर महिला डाळिंबाच्या बागेत झाडे छाटनी करत असताना कामगार महिला सत्यभामा राजेंद्र गवारे या महिलेने शेताच्या कडेला अंगावर काळे पट्टे असणारा प्राणी पाहून घाबरल्या.ही कल्पना बबनराव सालके यांना कल्पना दिल. सालके यांनी परिसरातील इतरांना गोळा करून हातात काठ घेऊन पाहिले असता झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. एवढा आवाज होऊनही कोणतीच हालचाल झाली नाही म्हणून धाडस करून जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या मृत अवस्थेत दिसून आल.