घोडेगाव रस्त्यावर आढळला जळालेल्या अवस्थेत मृतदेह
By Admin | Updated: May 18, 2017 13:24 IST2017-05-18T13:24:25+5:302017-05-18T13:24:25+5:30
पांढरीपूल परिसरात घोडेगाव रस्त्यावर गुरुवारी एका ३५ वर्षीय इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

घोडेगाव रस्त्यावर आढळला जळालेल्या अवस्थेत मृतदेह
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ १८ - नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपूल परिसरात घोडेगाव रस्त्यावर गुरुवारी एका ३५ वर्षीय इसमाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
पांढरीपूल परिसरात हॉटेल सिंहगडच्या बाजूला शेतात मृतदेह असल्याचे स्थानिक कामगारांच्या लक्षात आले. त्यांनी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. मयत व्यक्तीच्या डाव्या हातावर दिल कोरुन त्यात आर. एम. असे गोंदलेले आहे. अंगात गुलाबी शर्ट व काळी पँट होती. बाहेर कुठेतरी खून करून मृतदेह पांढरीपूल परिसरात आणून टाकल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत