सुरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय दारकुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:20 IST2021-04-13T04:20:18+5:302021-04-13T04:20:18+5:30

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय विश्वनाथ दारकुंडे, तर उपाध्यक्षपदी ईश्वर रामचंद्र लहाकर ...

Dattatraya Darkunde as the President of Suregaon Society | सुरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय दारकुंडे

सुरेगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय दारकुंडे

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी दत्तात्रय विश्वनाथ दारकुंडे, तर उपाध्यक्षपदी ईश्वर रामचंद्र लहाकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी साहेबराव पाटील यांनी कामकाज पाहिले. सचिव संतोष वागस्कर यांनी त्यांना मदत केली.

नुकतीच सुरेगाव सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली. त्यामध्ये कर्मयोगी कुंडलीकराव जगताप कुकडी साखर कारखान्याचे संचालक अंकुशराव रोडे व माजी सरपंच सर्जेराव रोडे यांच्या पॅनलला तेरापैकी नऊ जागा मिळवून बहुमत मिळाले होते, तर विरोधात डॉ.अनिल मोरे व गुलाब रामफळे यांच्या पॅनलच्या चार जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे रोडे गटाचे दत्तात्रय दारकुंडे व ईश्वर लहाकर यांची अध्यक्ष, उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

यावेळी अंकुशराव रोडे, सर्जेराव रोडे, सखुबाई लोखंडे, मीराबाई रोडे, राजेंद्र रोडे, संतोष शिंदे व संचालक उपस्थित होते. पदाधिकरी निवडी नंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी दारकुंडे व रोडे यांना शुभेच्छा दिल्या.

--

१२ सुरेगाव सोसायटी

सुरेगाव सेवा सोसायटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा संचालकांनी निवडीनंतर सन्मान केला.

Web Title: Dattatraya Darkunde as the President of Suregaon Society