श्रीगोंद्यात सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:24 IST2021-09-23T04:24:11+5:302021-09-23T04:24:11+5:30
श्रीगोंदा : सैनिक सहकारी बँकेचे श्रीगोंदा येथील संचालक सुदाम कोथिंबिरे यांचे वडील गणपत पर्वती कोथिंबिरे यांचा दशक्रिया विधी सत्यशोधक ...

श्रीगोंद्यात सत्यशोधक पद्धतीने दशक्रिया विधी
श्रीगोंदा : सैनिक सहकारी बँकेचे श्रीगोंदा येथील संचालक सुदाम कोथिंबिरे यांचे वडील गणपत पर्वती कोथिंबिरे यांचा दशक्रिया विधी सत्यशोधक पद्धतीने करण्यात आला.
यावेळी कोथिंबिरे कुटुंबीयांनी अस्थिविसर्जन कुठल्याही नदीत, ओढ्यातल्या पाण्यात सोडून प्रदूषण न करता शेतामधे खड्डे खोदून त्यात अस्थी टाकून चिंच, आंबा, नारळ, वड, पिंपळ अशी झाडे लावली. झाडांची जोपासना करून वडिलांच्या स्मृती जपण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. समाजाला दिशा देण्यासाठी अशा प्रयत्नांची गरज आहे. तरच सर्व समाज मानसिक गुलामगिरी सोडून कर्मकांड, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपराच्या जोखडातून मुक्त होईल, असे प्रवचनावेळी छत्रपती क्रांतिसेनेचे बाळासाहेब मिसाळ महाराज यांनी सांगितले. डॉ. चंद्रकांत कोथिंबिरे, भीमराव कोथिंबिरे आदी उपस्थित होते. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संघटनेला ११ हजार रुपये निधी देण्यात आला.