आरबीएनबी कॉलेजला शारदा तर एस.पी.कॉलेजला ज्ञानेश्वर करडंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 16:52 IST2017-10-03T16:52:27+5:302017-10-03T16:52:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  अहमदनगर -श्रीरामपूरच्या आरबीएनबी कॉलेजने शारदा करंडक तर पुण्याच्या एसपी कॉलेजने ज्ञानेश्वर करंडक पटकावला. पेमराज सारडा महाविद्यालय ...

Darneshwar Karadank to Sharda and SP College in RBNB College | आरबीएनबी कॉलेजला शारदा तर एस.पी.कॉलेजला ज्ञानेश्वर करडंक

आरबीएनबी कॉलेजला शारदा तर एस.पी.कॉलेजला ज्ञानेश्वर करडंक

ठळक मुद्देपेमराज सारडा महाविद्यालय आय़ोजित वादविवाद स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्क 

अहमदनगर -श्रीरामपूरच्या आरबीएनबी कॉलेजने शारदा करंडक तर पुण्याच्या एसपी कॉलेजने ज्ञानेश्वर करंडक पटकावला. पेमराज सारडा महाविद्यालय आयोजित २८ व्या वादविवाद स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले.

शारदा करंडक वाद स्पर्धेत सांघिक  प्रथम क्रमांक श्रीरामपूरच्या आरएनबी कॉलेजच्या प्रताप भवर व शुभम केणेकर या संघाने पटकावला. द्वितीय क्रमांक प्रवरानगरच्या पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील कॉलेजच्या संघाला पटकावला. या संघात मिताली नाळकरव अतिक शेख यांचा समावेश होता. तृतीय क्रमांक अहमदनगर कॉलेजला मिळाला. त्यामध्ये मनोज गोपीका व निशांत फलके यांचा समावेश होता. या स्पर्धेसाठीअ‍ॅड.विक्रम एडके व प्रा.गितांजली भावे यांनी परिक्षण केले.  ज्ञानेश्‍वर करंडक वाद स्पर्धेतसांघिक  प्रथम क्रमांक पुण्याच्या एस.पी. कॉलेजने पटकावला. या संघात हर्षदा अभ्यंकर व सावनी चोथे यांचा समावेश होता. तर संगमनेरच्या डॉ.डा.ए. ओहरा कॉलेजच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. यात अक्षता राणे व स्नेहल गुंजाळ यांचा समाव्श होता. तृतीय क्रमांक न्यू आर्टस कॉलेजला मिळविला. या संघात रुपाली गिरवले व स्नेहल डोळे यांचा समावेशआहे. या स्पर्धेचेपरिक्षण देवाषीश शेंडगे व श्रेणिक शिंगवी यांनी केले.

शारदा करंडक वैयक्तिक बक्षीसे - प्रथम - शुभम केणेकर, द्वितीय -अतिक शेख ,तृतीय – निशांत फलके, उत्तेजनाथ - प्रताप भवार, मनोज गोपीका, मिताली नाळकर, शिवेंद्र तिवारी.

ज्ञानेश्वर करंडक  वैयक्तिक पारितोषिके : प्रथम - हर्षदा अभ्यंकर, द्वितीय अवधूत पाटील, तृतीय - अक्षता राणे.,उत्तेजनार्थ - स्नेहा सुरवसे, रुपाली गिरवले, शुभांगी बाबर, ऋचा कुलकर्णी.

 

Web Title: Darneshwar Karadank to Sharda and SP College in RBNB College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.