दरेवाडी संघाने पटकावला नृसिंह चषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:30 IST2021-02-26T04:30:59+5:302021-02-26T04:30:59+5:30

केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी (पारगाव) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच ...

Darewadi team won the Nrusinha Cup | दरेवाडी संघाने पटकावला नृसिंह चषक

दरेवाडी संघाने पटकावला नृसिंह चषक

केडगाव : नगर तालुक्यातील भातोडी (पारगाव) येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा नुकताच पार पडला. प्रथम पारितोषिक नगर दरेवाडी संघाने तर द्वितीय संघर्ष क्रिकेट क्लब भातोडी व तृतीय सिंहगड (मुंबई) या संघाने पटकाविले आहे.

उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रवीण लबडे यांची निवड करण्यात आली. शिस्तप्रिय संघ म्हणून दौलावडगाव संघाची निवड झाली.

पारितोषिक वितरण पंचायत समितीचे सभापती प्रवीण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रवीण कोकाटे, माजी सरपंच बबनराव घोलप व निसार शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रथम पारितोषिक ३१ हजार १११, द्वितीय २५ हजार ५५५ व तृतीय १५ हजार ५५५ असे अनुक्रमे तीन बक्षिसे ठेवण्यात आली होती. राज्यातील एकूण ७० संघांनी सहभाग नोंदविला होता.

पारितोषिक वितरण भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिंचोडी पाटीलचे सरपंच मनोज कोकाटे, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथ कदम, सरपंच राहुल शिंदे, विजयकुमार बोरुडे, माजी सरपंच बबनराव घोलप, नृसिंह कृषी सेवा केंद्राचे प्रमुख तथा माजी कृषी अधिकारी रावसाहेब आघाव, राजेश परकाळे, युवा उद्योजक अशोक तरटे, उपसरपंच राजू पटेल, शिवसेना तालुका उपप्रमुख निसार शेख, शामराव घोलप, अल्ताफ पटेल, आशीर्वाद हॉटेलचे मालक सुनील थोरात, शंभूराजे हॉटेलचे मालक श्रीकांत काळे, शिक्षक नेते कैलास दहातोंडे, गणेश आठरे, सुनील थोरात, अविनाश झाम्बरे, दत्तात्रय जावळे, मनीष लोखंडे, भाऊसाहेब धलपे, अशोक धलपे, सहदेव लबडे, विलास लबडे, बाळासाहेब पवार, पांडुरंग लबडे, रावसाहेब पवार आदी उपस्थित होते. तसेच संयोजक टीमचे प्रतिनिधी प्रवीण लबडे, आदिनाथ शिंदे, दत्ता कदम, राजू काळे, सुधीर कदम, शिवाजी लबडे, साहिर पटेल, शरद घोरपडे उपस्थित होते.

-----

२५ भातोडी

भातोडी येथील क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

Web Title: Darewadi team won the Nrusinha Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.