नाचणीचा प्रयोग यशस्वी होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:03+5:302020-12-16T04:36:03+5:30
कृषी अधिकारी गोसावी तालुक्यात नवनवीन प्रयोग राबवत आहेत. निळ्या भातानंतर आदिवासी भागातील धामनवन आणि भंडारदरा परिसरातील ४० शेतकऱ्यांना ...

नाचणीचा प्रयोग यशस्वी होईल
कृषी अधिकारी गोसावी तालुक्यात नवनवीन प्रयोग राबवत आहेत. निळ्या भातानंतर आदिवासी भागातील धामनवन आणि भंडारदरा परिसरातील ४० शेतकऱ्यांना बारामती येथून फणसाची कलमे रोपे आणून लागवड करून घेतली. गतवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे रब्बी हंगामात म्हणजेच उन्हाळ्यात घेतल्या जात असलेल्या नाचणीचा अभ्यास केला. उन्हाळी नाचणीस फूटव्यांची संख्या अधिक असते व रोग प्रतिकार शक्तीही अधिक असून एकरी सोळा क्विंटल उत्पन्न मिळत असल्याने हा प्रयोग आपल्याही तालुक्यात राबविण्याचा विचार करत त्यांनी कोल्हापूर कृषी विद्यापीठचे प्रा डॉ सुनील कराड यांच्याशी संपर्क साधला. खडकी बुद्रुक येथील क्रांतिवीर सेंद्रिय उत्पादक शेतकरी गटाची निवड केली. या गटातील सभासदांशी चर्चा केल्यानंतर उन्हाळी नाचणीचे फायदे त्यांना सांगितले. शेतकऱ्यांना हे पटल्या नंतर कृषी अधिकारी गोसावी यांनी कोल्हापूर येथून फुले नाचणीचे २० किलो उपलब्ध केले.
सोमवारी कृषी अधिकारी गोसावी, मंडळ कृषी अधिकारी गिरीष बिबवे, भगवान वाकचौरे, शरद लोहकरे, आत्माचे बालनाथ सोनवणे यांनी क्रांतीवीर सेंद्रिय नागली उत्पादक शेतकरी गटाच्या वीस सभासदांना प्रत्येकी एक किलो बियाणे दिले. हा प्रयोग आम्ही नक्की यशस्वी करू असा विश्वास गटाचे सचिव अजित भांगरे यांनी या वेळी व्यक्त केला.