दमानिया यांनी घेतली हजारेंची भेट
By Admin | Updated: June 2, 2016 01:00 IST2016-06-02T00:54:11+5:302016-06-02T01:00:09+5:30
पारनेर : राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात लढा उभारलेल्या ‘आप’ च्या अंजली दमानिया यांनी बुधवारी दुपारी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.

दमानिया यांनी घेतली हजारेंची भेट
पारनेर : राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात लढा उभारलेल्या ‘आप’ च्या अंजली दमानिया यांनी बुधवारी दुपारी राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. खडसे यांच्याशी संबंधित सुमारे वीस मुद्यांची माहिती त्यांनी अण्णांना दिली. अभ्यास केल्यानंतर आपण यावर बोलू, असे अण्णा हजारे यांनी त्यांना सांगितले.
अंजली दमानिया यांनी सध्या महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. त्यासाठी त्या मुंबईत उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर दमानिया यांनी बुधवारी अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी खडसे यांच्या संपत्तीसह पिंपरी-चिंचवड येथील जमीन प्रकरण व इतर सुमारे वीस मुद्यांच्या माहितीची कागदपत्रे अण्णांना दिली. अण्णा हजारे यांनीही त्यांना या मुद्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला बोलता येणार नसल्याचे अण्णांनी सांगितले़
(तालुका प्रतिनिधी)