दहिगावने येथे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:20 IST2021-03-21T04:20:09+5:302021-03-21T04:20:09+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार दिलीप गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शनिवारी सकाळी ...

दहिगावने येथे दिलीप गांधी यांना श्रद्धांजली
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे माजी केंद्रीय मंत्री खासदार दिलीप गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शनिवारी सकाळी गावातील मुख्य चौकात आयोजित श्रद्धांजली सभेसाठी दहिगावने गटातील अनेक गावांचे नागरिक व गांधी समर्थक हजर होते. यावेळी स्वर्गीय दिलीप गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आपल्या कामाने, स्वभावाने स्वर्गीय गांधी सदैव स्मरणात राहतील. सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा आणि वेळेला साथ देणारा माणूस आपल्यात नाही. याचे फार मोठे दुःख असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ माळवदे, तालुका चिटणीस आसाराम नऱ्हे, युवा मोर्चा माजी तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण काशीद, जिल्हा चिटणीस बशीरभाई पठाण, कल्याण जगदाळे, आप्पासाहेब सुकाशे, स्वामी शिंदोरे, अनिल सुपेकर, जिवडे महाराज, डाॅ. अरुण पवार, रोहिदास घानमोडे, राजेंद्र चव्हाण, मनोज काळे, संतोष घुले, सचिन पारख, अतुल तोतला, पांडुरंग खंडागळे, शिवाजी मरकड, बाळासाहेब भिसे, प्रवीण भिसे, अशोक दळवी, दीपक शिंदे, जनार्दन बारे, दत्तात्रय जगताप, आप्पासाहेब बोडखे, अंबादास माताडे, खैरूभाई शेख आदी उपस्थित होते.
---
२० दहिगावने
शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथे माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.