शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दहिगाव बंधा-यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी; पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 15:53 IST

नगर तालुक्यातील दहिगाव येथे असणा-या सीना नदीच्या पात्रात गावक-यांनी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. याची साठवण क्षमता जवळपास १ टी.एम.सी. इतकी आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या बंधा-यात चांगला पाणी साठा झाला होता. दुष्काळी असणा-या या गावात कधी नव्हे तो इतका पाणी साठा झाल्याने गावात आनंदाचे वातावरण होते.

योगेश गुंडकेडगाव : नगर तालुक्यातील दहिगाव येथील बंधा-याचे दरवाजे बदलण्यासाठी शासनाकडून २३ लाख रुपयांचे नवे दरवाजे आले. मात्र जुने दरवाजे पाटबंधारे विभागाने वेळेत न बदलल्याने या बंधा-याला गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी सुरु आहे. गावक-यांनी जलयुक्त शिवाराचे पाहिलेले स्वप्न आता बंधा-याच्या पाण्यात वाहून जाताना पाहण्याची दुर्दैवी वेळ दहिगावकरांवर आली आहे.नगर तालुक्यातील दहिगाव येथे असणा-या सीना नदीच्या पात्रात गावक-यांनी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधला. याची साठवण क्षमता जवळपास १ टी.एम.सी. इतकी आहे. यंदा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने या बंधा-यात चांगला पाणी साठा झाला होता. दुष्काळी असणा-या या गावात कधी नव्हे तो इतका पाणी साठा झाल्याने गावात आनंदाचे वातावरण होते. या गावाचा समावेश जलयुक्त योजनेत करण्यात आला आहे. या योजनेतून याच बंधा-याचे जुने दरवाजे बदलून नवे दरवाजे टाकण्यात येणार होते. त्यासाठी शासनाचा २३ लाख रुपयांचा निधी मंजूर झालो. याच निधीतून या बंधाºयासाठी नवे दरवाजे गावात दाखल झाले. काही दरवाजे येणे बाकी होते.सरपंच मधुकर म्हस्के व गावक-यांनी जुने दरवाजे काढून नवे दरवाजे बसवण्यात यावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र जुने दरवाजे न काढताच नवे अर्धवट दरवाजे बसवण्याचे काम सुरु झाले़ त्यामुळे या बंधा-यातील पाण्याला गळती सुरु झाली. इतके दिवस साठवलेले लाखो लिटर पाणी आता वाहून जात आहे. बंधा-याचे खालील दरवाजातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. याबाबत गावक-यांनी पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली़ मात्र, उपयोग झाला नाही.गावात असणा-या या बंधा-यात जवळपास १ टी. एम. सी. इतका पाणी साठा आहे. आता हे पाणी वाहून जात आहे. बंधा-यातील पाण्यामुळे गावाची दुष्काळातून सुटका होईल, असे वाटत असतानाच बंधा-याला गळती लागली अन् लाखो लीटर पाणी वाहून जाऊ लागले आहे.

गावातील बंधा-याचे दरवाजे बदलण्यासाठी काही नवे दरवाजे बसवण्याचे काम सुरु करण्यात आले. मात्र जुने दरवाजे काढावेत, अशी अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या बंधा-यातील पाण्यामुळे गावाचे शिवार जलमय झाले होते. आता बंधा-याला मोठी गळती सुरु असल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.-मधुकर म्हस्के, सरपंच, दहिगाव

टॅग्स :AhmednagarअहमदनगरWaterपाणीDamधरण