डहाणूतील प्रयोगशाळा तंत्रज्ञाची आत्महत्या

By Admin | Updated: June 29, 2015 01:55 IST2015-06-29T01:55:30+5:302015-06-29T01:55:30+5:30

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नोकरीस असलेले शिवलाल तुकाराम जावळे (४७) यांनी जामखेडमध्ये भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

Dahanu Laboratory Technician Suicide | डहाणूतील प्रयोगशाळा तंत्रज्ञाची आत्महत्या

डहाणूतील प्रयोगशाळा तंत्रज्ञाची आत्महत्या

जामखेड (अहमदनगर) : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आरोग्य विभागात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नोकरीस असलेले शिवलाल तुकाराम जावळे (४७) यांनी जामखेडमध्ये भावाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे जावळे यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. चार दिवसांपूर्वी कुटुंबाला डहाणू येथील राहत्या घरी ठेवून जावळे कामानिमित्त जामखेड येथे आले होते. रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांनी भावाच्या घरी गळफास घेतला. जावळे यांच्या खिशात तीन पानांची चिठ्ठी आढळली. जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Dahanu Laboratory Technician Suicide