धनाजीनगर येथे रहिवाशांना दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:19+5:302021-07-07T04:27:19+5:30

धनाजीनगर येथे मनपाच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले असून तेथे जनावरे पाळली जात आहेत. अनेकदा तेथे उघड्यावर जनावरांची कत्तल ...

Dadagiri to the residents at Dhanajinagar | धनाजीनगर येथे रहिवाशांना दादागिरी

धनाजीनगर येथे रहिवाशांना दादागिरी

धनाजीनगर येथे मनपाच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले असून तेथे जनावरे पाळली जात आहेत. अनेकदा तेथे उघड्यावर जनावरांची कत्तल केली जाते. परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी या संदर्भात महापालिकेत तक्रार दिल्यानंतरही महापालिकेकडून काहीही दखल घेण्यात आलेली नाही. या वस्तीतील काही तरुणांनी शेजारील नागरिकांना त्रास देऊन धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात तोफखाना पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या दहशतखोर तरुणांना समज दिली. मात्र त्यानंतरही मंगळवारी सकाळी या तरुणांनी शेजारील नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना ही माहिती कळल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक किरण सुरसे हे तातडीने घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत हे तरुण पसार झाले होते. महापालिकेने या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कारण यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याचा धोका आहे.

Web Title: Dadagiri to the residents at Dhanajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.