जैन मंदिरातील दानपेटी चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 13:11 IST2017-09-20T13:11:24+5:302017-09-20T13:11:29+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील आदेश्वर जैन मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेली़ या दानपेटीत सुमारे दोन हजारांची रोकड होती़ ही ...

Dacoity stolen in Jain temple | जैन मंदिरातील दानपेटी चोरीस

जैन मंदिरातील दानपेटी चोरीस

श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील आदेश्वर जैन मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेली़ या दानपेटीत सुमारे दोन हजारांची रोकड होती़ ही घटना बुधवारी दुपारी घडली़
पोलिसांना घटना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी हजेरी लावली़ श्वानपथकाने बाबुर्डी रस्त्यापर्यंत माग काढला़ दानपेटी बायपासला टाकून चोरटे फरार झाले़ जैन मंदिराचे अध्यक्ष दिलीप शांतीलाल मेहता यांनी फिर्याद दिली असून, दान पेटी चोरीला गेली यांची माहिती मंदिरातील पुजारी संजय शहा याने विश्वस्तांना दिली़ पोलीस पथके तपासासाठी रवाना झाली आहेत़
गेल्या महिन्यात जैन श्वेतांबर मंदीरातील पंचधातुची मूर्ती चोरट्यांनी चोरून नेली होती़ त्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसतानाच पुन्हा तेथेच चोरी झाली आहे़

देवच असुरक्षित
देवच असुरक्षित झाले असून चोरट्यांनी देवस्थानांना टार्गेट केले आहे़ पोलिसांनी देवालयांच्या सुरक्षांचा आढावा घेण्याची गरज आहे़ त्याचबरोबर हनुमाननगरमधील तात्याबा मारुती बोरुडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ५० हजाराचे सोन्याचे दागिने व १२ हजाराची रोकड लंपास केली आहे.

Web Title: Dacoity stolen in Jain temple