सिलिंडरचे अनुदान वेळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST2021-03-16T04:21:01+5:302021-03-16T04:21:01+5:30
श्रीरामपूर : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान वेळेवर खात्यावर येत नाही. त्यामुळे सरकारने त्याची गंभीर ...

सिलिंडरचे अनुदान वेळेत
श्रीरामपूर : गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान वेळेवर खात्यावर येत नाही. त्यामुळे सरकारने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे यांनी केली आहे.
घरगुती गॅस सिलिंडरचे दर आठशे रुपयांवर गेले आहेत. कोरोना संकटात नागरिकांची आर्थिक कोंडी झालेली असताना ही दरवाढ पेलवणारी नाही. त्यातच सिलिंडरचे अनुदान वेळेवर मिळत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे. घरपोच सिलिंडर पुरवणारे २० रुपये दर आकारणी करतात, असा आरोप शितोळे यांनी केला.
निवेदनावर शहराध्यक्ष मंगेश छतवाणी, जिल्हाध्यक्ष मनोहर बागुल, राजाभाऊ देशपांडे, प्रदेश संघटक विजय जगताप, कार्याध्यक्ष चिलिया तुवर, वसंत गायकवाड, नागनाथ डोंगरे, बाळासाहेब जाधव, शिवाजी फोफसे, जयराम क्षीरसागर आदींच्या सह्या आहेत.