कुकडी कालव्यावर होणार संचारबंदी लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:31+5:302021-02-05T06:33:31+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक मंगळवारी स्वप्नील काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्वप्नील काळे पुढे म्हणाले, ...

कुकडी कालव्यावर होणार संचारबंदी लागू
श्रीगोंदा तालुक्यातील पाणी वापर संस्था प्रतिनिधींची बैठक मंगळवारी स्वप्नील काळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
स्वप्नील काळे पुढे म्हणाले, श्रीगोंदा तालुक्याला शेती सिंचनासाठी ७५० एमसीएफटी देण्यात येणार आहे. करमाळ्याचे आवर्तन संपले की, कर्जतची पाणी पातळी कायम ठेवून १३२ जोड कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे.
पाझर तलाव, नालाबंडीग शेततळे, ओढे नाले, नद्यांना पाणी सोडण्यात येणार नाही. तसे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले आहे.
सर्व शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळेल; पण त्यासाठी पाणी वापर संस्था प्रतिनिधींनी दक्ष राहण्याची गरज आहे.
यावेळी माजी सभापती शहाजी हिरवे, नंदकुमार कोकाटे, अशोक होले, शफिक शेख, राहुल जाधव आदी उपस्थित होते. आभार उपाभिंयता अविनाश फडतरे यांनी मानले.