मोबाईल ॲपच्या मदतीने गुन्हेगारीला आळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:56+5:302021-07-14T04:24:56+5:30
पोलीस प्रशासनाने मुख्य प्रशासकीय कार्यालयात सोमवारी आयोजित केलेल्या ग्राम सुरक्षा कार्यक्रमाच्या प्रशिक्षण सभेत आमदार कानडे बोलत होते. यावेळी तालुक्यातील ...

मोबाईल ॲपच्या मदतीने गुन्हेगारीला आळा
पोलीस प्रशासनाने मुख्य प्रशासकीय कार्यालयात सोमवारी आयोजित केलेल्या ग्राम सुरक्षा कार्यक्रमाच्या प्रशिक्षण सभेत आमदार कानडे बोलत होते. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, पोलीसपाटील व ग्रामसेवक उपस्थित होते. रात्री - बेरात्री दरोड्यासारख्या गुन्ह्याचा प्रसंग आल्यास किंवा एकट्या - दुकट्यावर गुन्हेगारांनी हल्ला केल्यास सर्व गावकऱ्यांनी एकत्रित यायला हवे. त्यासाठी ग्राम सुरक्षा दल कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असे कानडे म्हणाले.
आपण अत्यंत भीषण अशा कोरोना महामारीच्या संक्रमण काळामध्ये आहोत. अनेकांनी आपले जीवलग गमावले आहेत. त्यातच चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शेतावर राहणाऱ्या कष्टकरी कुटुंबांवर हल्ले होत आहेत. गावातील श्रीमंत शेतकऱ्यांची कुटुंबे हेरून दरोडे घातले जात आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने मोबाईलवर ॲपच्या माध्यमातून एकाच वेळेस सर्व ग्रामस्थांना फोन कॉल करण्याचे तंत्र विकसित केले, ते उपयुक्त आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे रोखले जाणार आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी पायाभरणी केलेल्या डिजिटल क्रांतीने हे सर्व शक्य होत आहे, असे आमदार कानडे म्हणाले. यावेळी ज्ञानेश्वर मुरकुटे, समीन बागवान, सतीश बोर्डे, डी. के. गोरडे, पोलीस निरीक्षक संजय सानप, निरीक्षक मधुकर साळवे उपस्थित होते.
--------
फोटो ओळी : कानडे
ग्रामसुरक्षा कार्यक्रमात सरपंचांसमोर बोलताना आमदार लहू कानडे.