वाचन संस्कृती ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:37 IST2021-03-13T04:37:39+5:302021-03-13T04:37:39+5:30
श्रीरामपूर : वाचनातून मानव समृद्ध आणि नीतिशील बनतो. वाचन संस्कृती ही जीवनगती बनावी, असे प्रतिपादन शिर्डी येथील साईबाबा महाविद्यालयातील ...

वाचन संस्कृती ही
श्रीरामपूर : वाचनातून मानव समृद्ध आणि नीतिशील बनतो. वाचन संस्कृती ही जीवनगती बनावी, असे प्रतिपादन शिर्डी येथील साईबाबा महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुनीता वडीतके यांनी केले. येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने मराठी भाषा पंधरवडानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा. वडितके बोलत होत्या.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी मराठी भाषेची शक्ती व भक्ती या याविषयी प्रास्तविक केले. यावेळी विरेश पारखे, वेदिका पारखे, गणेशानंद उपाध्ये, मंदाकिनी उपाध्ये, निर्मिक उपाध्ये, चैतन्य वाघमारे, आदी उपस्थित होते.
डॉ. उपाध्ये यांच्या संत साहित्य, फिरत्या चाकावरती, अनुभवाच्या कविता, साहित्य संशोधन, तसेच प्राचार्य मंगल श्रीधर पाटील लिखित मंगलपर्व या पुस्तकावर डॉ. वडितके यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. विठ्ठल वाघ लिखित मायबाप या ओवीबद्ध पुरस्कार संशोधनावर चर्चा झाली. वाचन संस्कृतीचे उपक्रम भूषणावह असल्याचे विरेश पारखे यांनी यावेळी नमूद केले. गणेश उपाध्ये यांनी आभार मानले.
---------