कुकडीचे पाणी श्रीगोंद्यात
By Admin | Updated: August 17, 2015 00:01 IST2015-08-16T23:55:12+5:302015-08-17T00:01:52+5:30
श्रीगोंदा : कुकडीचे पिकासाठी सोडलेले आवर्तन श्रीगोंद्यात रविवारी पोहोचले.

कुकडीचे पाणी श्रीगोंद्यात
श्रीगोंदा : कुकडीचे पिकासाठी सोडलेले आवर्तन श्रीगोंद्यात रविवारी पोहोचले. सुरुवातीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी विसापूर, मोहरवाडी, वेळू तलावात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर कर्जतकडे पाणी झेपवणार आहे.
कुकडी प्रकल्पात १२ हजार ४५९ एमसीएफटी (४१ टक्के) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी १५ आॅगस्ट अखेर कुकडी प्रकल्पात २३ हजार ०२८ एम.सी.एफ.टी. (७५ टक्के) इतका पाणी साठा होता. पावसाचे प्रमाण कमी असल्याने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा तालुका लाभक्षेत्रातील पिके व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार १३ आॅगस्टपासून कुकडीचे आवर्तन सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला.
कुकडी लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने भूजल पातळी खोल गेली आहे तर सर्व तलावातील पाणी साठे आटले आहेत. त्यामुळे पिण्याचे व शेतीच्या पाण्याचे भयानक जलसंकट उभे राहिले आहे.
विसापूर तलावावरून २० ते २२ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना तर वेळू तलावावर श्रीगोंदा शहराची नळ पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. हे तलाव कोरडे पडले आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत कुकडीचे पाणी येण्याच्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
(तालुका प्रतिनिधी)