सिटीस्कॅन मशीन त्वरित खरेदी करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:19 IST2021-05-01T04:19:18+5:302021-05-01T04:19:18+5:30

कोपरगाव : शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून, एकच सिटीस्कॅन केंद्र आहे. त्यामुळे परिषदेने फंडातून सिटीस्कॅन मशीन त्वरित खरेदी ...

CTscan machine should be purchased immediately | सिटीस्कॅन मशीन त्वरित खरेदी करावे

सिटीस्कॅन मशीन त्वरित खरेदी करावे

कोपरगाव : शहरात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असून, एकच सिटीस्कॅन केंद्र आहे. त्यामुळे परिषदेने फंडातून सिटीस्कॅन मशीन त्वरित खरेदी करावी, अशी मागणी भाजप - शिवसेना नगरसेवकांनी कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

देशामध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करून लढा देत आहे. मात्र; पुरेशा साधन सामग्रीअभावी रुग्णांना सेवा देण्यात फार मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. त्यामुळे कोपरगाव शहर व ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यासाठी नगर परिषदेच्या फंडातून तातडीने सिटीस्कॅन मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव विशेष सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये सदरचा ठराव, आम्ही सर्वानुमते मंजूर करून देण्यास तयार आहोत. त्यामुळे गोरगरीब जनतेला दिलासा मिळेल. त्यामुळे लवकर उपचार घेणे सोयीस्कर होऊन त्यांची खासगी उपचार घेताना आर्थिक पिळवणूक थांबेल. आपण याबाबत लवकरात-लवकर कार्यवाही करून कोपरगावच्या जनतेला दिलासा द्यावा. यावेळी भाजपाचे गटनेते रवींद्र पाठक,शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक जनार्दन कदम, आरीफ कुरेशी, शिवाजी खांडेकर उपस्थित होते.

Web Title: CTscan machine should be purchased immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.