वाळू तस्करांची तलाठ्यास जबर मारहाण

By Admin | Updated: April 15, 2016 23:11 IST2016-04-15T23:02:59+5:302016-04-15T23:11:24+5:30

संगमनेर : विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांनी तलाठ्यास जबर मारहाण केल्याची घटना पठार भागात घडली.

The cruelty of sand smugglers | वाळू तस्करांची तलाठ्यास जबर मारहाण

वाळू तस्करांची तलाठ्यास जबर मारहाण

दोघांविरुद्ध गुन्हा : कोठे बुद्रूकमध्ये घटना
संगमनेर : विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांनी तलाठ्यास जबर मारहाण केल्याची घटना पठार भागात घडली. याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध घारगाव पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
गुरुवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास किसन रामदास तांगडकर व शरद शिवराम तांगडकर (दोघे रा. तांगडी) हे मुळा नदी पात्रातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये वाळू भरून कोठे बुद्रूक गावामधून जात होते. दरम्यान, तलाठी रामदास मारुती पिचड यांनी त्यांना रासकाआई मंदिराजवळ अडवून तुमच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना आहे का? अशी विचारणा केली. याचा राग अनावर होवून दोघांनी पिचड यांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच वाळूने भरलेला ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. याप्रकरणी पिचड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी किसन तांगडकर व शरद तांगडकर या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गोरख शिंदे करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The cruelty of sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.