गर्दनीत एकाची निर्घृण हत्या

By Admin | Updated: June 9, 2017 13:37 IST2017-06-09T13:37:14+5:302017-06-09T13:37:14+5:30

गर्दनी येथे धोंडीबा नारायण वाकचौरे (वय ६८, रा. परखतपूर, ता. अकोले) यांची निर्घृण हत्त्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

The cruel assassination of one by one | गर्दनीत एकाची निर्घृण हत्या

गर्दनीत एकाची निर्घृण हत्या

आॅनलाईन लोकमत
अकोले, दि़.९ - तालुक्यातील गर्दनी येथे धोंडीबा नारायण वाकचौरे (वय ६८, रा. परखतपूर, ता. अकोले) यांची निर्घृण हत्त्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही़
मयत वाकचौरे हे वारकरी संप्रदायातील व निराधार असल्याने ते अगस्ती आश्रम येथे रहात होते. गुरुवारी ते आपल्या बहिणीच्या घरी गर्दनी येथे गेले होते. रात्री घरासमोरील पडवीत झोपले असताना पडवीचा दरवाजा उघडा राहिला. मध्यरात्रीच्या सुमारास मारेकऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित करुन वाकचौरे यांची हत्या केली़ वाकचौरे यांच्या आवाजाने त्यांच्या बहिणीचे पती दशरथ नाईकवाडी यांनी घराच्या खिडकीतून पाहिले असता दोघे जण मोटारसायकलवरून जाताना त्यांनी पाहिले़ वाकचौरे हे अध्यात्मिक क्षेत्रातील असल्याने त्यांचे कुणाशी वैर नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे चोरीच्या उद्देशातून हा खून झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गर्दनी परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: The cruel assassination of one by one