भाजीपाला खरेदी करण्यासाठी लोणी खुर्दमध्ये नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:23 IST2021-05-25T04:23:11+5:302021-05-25T04:23:11+5:30
कोरोनावर मात करण्यासाठी सध्या संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदीतून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या आहेत. मात्र त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी ...

भाजीपाला खरेदी करण्यासाठी लोणी खुर्दमध्ये नागरिकांची गर्दी
कोरोनावर मात करण्यासाठी सध्या संचारबंदी सुरू आहे. या संचारबंदीतून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आल्या आहेत. मात्र त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती घेतली जात नसल्याचे सोमवारी (दि. २४) लोणी खुर्द गावातील खंडोबा मंदिर परिसर, लोणी खुर्द आणि लोणी बुद्रूक या गावामध्ये असलेल्या ओढ्यानजीक भाजीपाला खरेदी करण्यासाठी झालेल्या गर्दीहून दिसून आले. संधी दिली की लोक विनाकारण घराबाहेर पडतात. गर्दी करतात, हे सोमवारी पुन्हा एकदा येथे दिसून आले. यावेळी खबरदारीच्या उपाययोजना व नियमांचे उल्लंघन होत होते. बहुतांश नागरिकांनी मास्क घातलेले नव्हते. तसेच सुरक्षित अंतरदेखील पाळण्यात येत नव्हते. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याला एक प्रकारे अडथळा आणण्याचे काम नागरिकांकडूनच सुरू असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले. या बेजबाबदार नागरिकांना प्रशासनाने वेळीच समज देणे गरजेचे आहे.
240521\img_20210524_084250522.jpg
लोणी खुर्द(ता.राहाता) गावात सोमवारी सकाळी भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.