कुकडीपट्ट्यात असंतोष

By Admin | Updated: August 3, 2014 01:10 IST2014-08-03T00:10:17+5:302014-08-03T01:10:16+5:30

पारनेर : आमच्यासमोर पलिकडील गावाच्या बाजुने पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये कुकडीच्या कालव्यात मोटारी सुरू आहेत. परंतु आमच्या मोटारीवर कारवाई होते.

Crisp dissent | कुकडीपट्ट्यात असंतोष

कुकडीपट्ट्यात असंतोष

पारनेर : आमच्यासमोर पलिकडील गावाच्या बाजुने पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये कुकडीच्या कालव्यात मोटारी सुरू आहेत. परंतु आमच्या मोटारीवर कारवाई होते. ही सापत्नभावाची वागणूक कशासाठी? असा संतप्त सवाल पारनेर तालुक्यातील कुकडी लाभपट्ट्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
कुकडी कालव्यात दोन दिवसापूर्र्वी पाणी सोडण्यात आले. पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात श्रीगोंदा, कर्जत व इतर परिसरात सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. कुकडीचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी सोडल्याने कुकडी लाभक्षेत्रातील पारनेर तालुक्यातील निघोज, जवळा, शिरापूर, वडगाव गुंड, म्हस्केवाडी, अळकुटीचा काही परिसर यासह वाडेगव्हाणपर्यंत असलेल्या चौदा गावांमधील शेतकऱ्यांनी विद्युत मोटारींनी पाणी उपसा करू नये यासाठी पारनेर तालुक्यात दोन अधिकारी, दहा पोलीस यांचे भरारी पथक नेमले होते. या भागात जाऊन कुकडी कालव्यात शेतकऱ्यांच्या मोटारी असल्यास त्या जप्तची कारवाई करण्यात येते किंवा पाईप कापून टाकले जातात, असे महेश शिरोळे, रवींद्र गोरडे यांनी सांगितले. प्रांताधिकारी संतोष भोर यांच्या पथकाने दोन दिवसापूर्र्वी निघोज भागात सहा विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या. तरीही कुकडीचे अधिकारी काही ठिकाणी कारवाई करीत आहेत, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)
धनदांडग्यांवर
कारवाई करावी
पाऊस गायब झाल्याने पारनेर तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. कुकडी कालव्याच्या आवर्तनामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना चांगला पाऊस पडेपर्यंत सुरू राहून अनेक गावांना पिण्याचे पाणी मिळेल मग शेतीसाठी धनदांडगे शेतकरीच मोठ्या मोटारी लावून पाणी उपसा करतात. सामान्य शेतकरी थोड्या प्रमाणावर मोटार लावतात. मग धनदांडग्यांच्या मोटारींवर कारवाई केली तर स्वागतच आहे.
- संतोष खोडदे, तालुका सरचिटणीस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पिके नाहीत
तरीही कारवाई
कुकडीचे उशिरा आवर्तन व पावसाअभावी शेतात पिके नाहीत. कॅनॉलला पाणी आल्यानंतरच विहिरींनाही पाणी येते. मग अधिकाऱ्यांनी कारवाई कशाला करायची?
- ताराचंद काळे, शेतकरी,पठारवाडी
आमच्यावर अन्याय का?
पारनेर तालुक्यातील वडनेर, चोंभूतसह परिसरातील गावांच्या शेजारीच पुणे जिल्ह्यातील गावे आहेत.कालव्याच्या पलिकडील गावे या कालव्यातून सर्रास मोटारी लावून पाणी उपसा करीत आहेत. निघोजजवळील टाकळी हाजी परिसरातही मोटारी सुरू आहेत. मग आमच्यावर अन्याय का?
- किसन पानमंद, आदिनाथ म्हस्के, सुरेश गोरडे, संतोष म्हस्के, शेतकरी
पिण्यासाठीच आवर्तन
पारनेरसह नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठीच कुकडीचे आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी वापरणारांवर कारवाई सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये कालव्याजवळ मोटारी सुरू असल्यातरी कार्यक्षेत्र दुसरे असल्याने आम्ही काही करू शकत नाही. आम्हाला वरिष्ठांकडून आलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाई सुरू आहे.
- संतोष भोर, प्रांताधिकारी,पारनेर,श्रीगोंदा

Web Title: Crisp dissent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.