मुलांमध्ये व्हायरल सर्दी व तापाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:27+5:302021-09-09T04:26:27+5:30
श्रीरामपूर शहरामध्ये बालरोग तज्ज्ञांकडे व्हायरल आजाराने त्रस्त झालेली दररोज ५० पेक्षा जास्त लहान मुले उपचारासाठी येत आहेत. मात्र, हे ...

मुलांमध्ये व्हायरल सर्दी व तापाचे संकट
श्रीरामपूर शहरामध्ये बालरोग तज्ज्ञांकडे व्हायरल आजाराने त्रस्त झालेली दररोज ५० पेक्षा जास्त लहान मुले उपचारासाठी येत आहेत. मात्र, हे हवेतून पसरणाऱ्या साथीचे रुग्ण आहेत. त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. तीन दिवसांमध्ये हा ताप अटोक्यात येतो, असे तज्ज्ञ म्हणतात. मात्र, घरातील एका मुलाला जर लागण झाली, तर अन्य मुलेही लगेच बाधित होतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
-----------
डेंग्यूचे संकट वाढले
तीन दिवसांनंतरही ताप कायम राहिल्यास ती धोक्याची घंटा मानली जाते. ताप, सर्दी व खोकला या बरोबरीने अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, मुलांचे खेळणे बंद होणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत. डासांमुळे मलेरियाचा धोका उद्भवतो.
-----------
ही काळजी घ्या
लहान मुले आजारी पडली, तरी त्यांचे खाणे-पिणे बंद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवावे. तेलकट व तुपकट पदार्थ त्यांना देऊ नये.
--------
काही पालक मुलांना ताप येताच, स्वत: परस्पर काही चाचण्या करून घेतात, तसे करू नये. त्याचा मुलांना त्रास होतो. डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी व त्यांचीच सूचना अंमलात आणावी.
-डॉ.भूषण देव, बालरोग तज्ज्ञ, श्रीरामपूर.
--------
स्टार ११५१