शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

मोदी सरकारमुळे शेतकऱ्यांवर संकट

By admin | Updated: October 2, 2014 23:51 IST

नेवासा/अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे शेतकरी हिताविरुद्ध चाललेल्या सरकारला जनतेने शिकवलेला धडा आहे.

नेवासा/अहमदनगर : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या पोटनिवडणुकांत भाजपाचा झालेला पराभव म्हणजे शेतकरी हिताविरुद्ध चाललेल्या सरकारला जनतेने शिकवलेला धडा आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करणारी सत्ता आणि सत्ताधारी नकोत हाच संदेश त्यातून जनतेने दिला आहे. कांदा, कापूस, डाळिंबावरील निर्यात बंदी करून आणि साखर निर्यातीवरील अनुदान थांबवून केंद्र सरकारने चार महिन्यातच शेतकऱ्यांसमोर संकट उभे केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. उभ्या आयुष्यात छत्रपतींची शिवजयंती साजरी केली का? असा सवाल भाजपाला करून आज छत्रपतींच्या नावाने मते मागता असा टोलाही लगावला. घोडेगाव (ता.नेवासा) येथील बाजार समिती उपआवारात राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार शंकरराव गडाख व नगर येथे संग्राम जगताप यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आजचे केंद्रातील मोदी सरकार गरिबांचा विचार करायलाच तयार नसल्याचा आरोप करतत्यामुळे राज्याच्या हिताची जपवणूक करणारे कणखर सरकार राष्ट्रवादीच देऊ शकते असे ते म्हणाले. पवारांनी कांद्याच्या भावाला हात घालत कांद्याचे भाव वाढले की दिल्लीत दंगा होतो पण बाटली बंद शुद्ध पाण्यासाठी २० रुपये घालतात तर कांद्यामागे ७५ पैसे जास्त मिळाले तर गोंधळ का करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.घोडेगावात पवार म्हणाले, मला राज्यात जे घडवायचे मनात होते त्याची पूर्तता आमदार शंकरराव गडाख यांनी या मतदारसंघात करून दाखवली. त्यामुळे काम करणाऱ्याला मते मागायला मी आलो आहे. नगर येथील सभेत ते म्हणाले, येथील सेनेच्या आमदाराने जातीय द्वेष निर्माण केला. उद्योग व्यवसायाची अडवणूक केली. त्यामुळे विकास खुंटला. नगरचे हे तण उपटून टाका, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी पाचपुतेंवर टीका केली. घोडेगावच्या सभेत प्रास्ताविक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी केले. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व आमदार शंकरराव गडाख, विठ्ठलराव लंघे यांची यावेळी भाषणे झाली.नगरच्या सभेत दादा कळमकर यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर पिचड, शंकरराव घुले, आमदार अरुण जगताप, बाळासाहेब बोराटे, किरण काळे, शारदा लगड होते. या सभांना जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, प्रशांत गडाख, शंकर लोखंडे, नंदू पाटील, सभापती श्रीरंग हारदे, अरुण जाधव, संदीप कुऱ्हाडे, आप्पासाहेब जाधव, निजामभाई इनामदार, भैय्यासाहेब देशमुख, सोमनाथ धूत, नानासाहेब नवथर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)