तलाठी आत्महत्याप्रकरणी पुण्याच्या तरूणावर गुन्हा
By Admin | Updated: December 4, 2014 15:25 IST2014-12-04T15:25:03+5:302014-12-04T15:25:03+5:30
समशेरपूर सजाच्या महिला तलाठी आत्महत्याप्रकरणी खडकी (पुणे) येथील तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तलाठी आत्महत्याप्रकरणी पुण्याच्या तरूणावर गुन्हा
>अकोले : समशेरपूर सजाच्या महिला तलाठी आत्महत्याप्रकरणी खडकी (पुणे) येथील तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मयत प्रज्ञा राहुल निकाळजे यांची आई उषा राहुल निकाळजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आकाश चंद्रकांत इंगवले (रा. खडकी, पुणे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीस लवकरच अटक करू, असे पोलीस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी स्पष्ट केले. तलाठी प्रज्ञा राहुल निकाळजे (वय २७, रा. खडकी, पुणे) यांनी दि. २0 नोव्हेंबरला अकोले येथे राहत असलेल्या भाडोत्री घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मयताच्या आईने अकोले पोलिसांकडे आकाश चंद्रकांत इंगवले याच्याविरुध्द तक्रार दाखल केली आहे. हा आरोपी प्रज्ञा यांना लग्नाची मागणी घालत त्रास देत होता. त्याला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली, असे फिर्यादित म्हटले आहे.
(तालुका प्रतिनिधी)