शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
3
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
4
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
5
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
6
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
7
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
8
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
9
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
10
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
11
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
13
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
14
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
15
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
16
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
17
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
18
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
19
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
20
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरतीतील ११ डमींवर गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 16:57 IST

पावणेदोन वर्षापूर्वी झालेल्या तलाठी भरतीत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अहमदनगर : पावणेदोन वर्षापूर्वी झालेल्या तलाठी भरतीत बनावट कागदपत्रांच्या आधारे डमी बसलेल्या ११ उमेदवारांवर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आठ  जिल्ह्यांतील आहेत.

जिल्ह्यातील ८४ तलाठी पदासाठी महापोर्टलमार्फत २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.  उमेदवारांनी ही परीक्षा आपापल्या जिल्ह्यातून ऑनलाईन दिली. त्यानंतर २३ डिसेंबर २०१९ रोजी १२५ जणांची प्रारूप यादी प्रशासनाने जाहीर केली. त्या उमेदवांना ३ ते ७ जानेवारीदरम्यान कागदपत्रांच्या छाननीसाठी नगर  जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पडताळणी केल्यानंतर  उमेदवारांचे कागदपत्रावरील फोटो व प्रत्यक्षातील उमेदवार याबाबत संशय आल्याने परीक्षा केंद्रातील सीसीटीव्ही  फुटेज तपासण्यात आले. त्यात ११ उमेदवार डमी आढळले.

यासंदर्भात आता वर्षभरानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्या  सूचनेवरून सामान्य प्रशासनच्या तहसीलदार माधुरी आंधळे यांनी ९ मार्च रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपींविरोधात भादंवि ४२०, ४१९, ४१७ आदी कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला. उमेदवार  भंडारा, गडचिरोली, धुळे, औरंगाबाद, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, पुणे जिल्ह्यातील आहेत.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय