गांधींसह संचालक मंडळावरील गुन्हा रद्द करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:17 IST2020-12-26T04:17:00+5:302020-12-26T04:17:00+5:30

गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती झाली आहे. बँकेच्या ठेवी व वाढता विस्तार गांधी यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. बँकेच्या विरोधी ...

The crime on the board of directors including Gandhi should be canceled | गांधींसह संचालक मंडळावरील गुन्हा रद्द करावा

गांधींसह संचालक मंडळावरील गुन्हा रद्द करावा

गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेची प्रगती झाली आहे. बँकेच्या ठेवी व वाढता विस्तार गांधी यांच्या कर्तृत्वाची साक्ष आहे. बँकेच्या विरोधी मंडळातील काही सभासद गांधी यांचा राजकीय पराभव करू शकत नसल्याने त्यांनी बँकेच्या हितास बाधा आणणारी अनेक कृत्ये वेळोवेळी केली आहेत. व्यक्तीद्वेषातून गांधी व संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या तपासी अधिकाऱ्यांनी विरोधी मंडळातील सभासदांशी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडणारा अहवाल तयार केला आहे. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, असेही निवेदनातून म्हटले आहे.

निवेदनावर नगराध्यक्ष राणी मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे मन्सूरभाई फारोकी, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश मगरे, काँग्रेसचे डॉ. अमोल फडके, मनसेचे गणेश रांधवणे, नगरसेवक कमलेश गांधी, अशोक आहुजा यांच्यासह जगदीश धूत, अमोल घोलप, किरण भोकरे, बापूराव धनवडे, प्यारेलाल शेख, सूरज लांडे, दत्ता फुंदे, सुनील रासने, कासमभाई शेख, अशोक खिळे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: The crime on the board of directors including Gandhi should be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.