काँग्रेसचे किरण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:21 IST2021-05-08T04:21:38+5:302021-05-08T04:21:38+5:30

महापालिकेतील उपायुक्त यशवंत डांगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मनोज गुंदेचा, खलीलभाई चौधरी व अनीस ...

Crime against office bearers including Kiran Kale of Congress | काँग्रेसचे किरण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

काँग्रेसचे किरण काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

महापालिकेतील उपायुक्त यशवंत डांगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मनोज गुंदेचा, खलीलभाई चौधरी व अनीस चुडीवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्यावतीने ऑक्सिजन बेड असलेले कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी करत काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिकेत ठिय्या आंदोलन केले होते. महापालिका आयुक्तांनी स्वतः येऊन आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी करत हे आंदोलन गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत करण्यात आले होते. यावेळी महापालिकेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनदरम्यान कोरोनासंदर्भात लागू करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने आंदोलनकर्त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against office bearers including Kiran Kale of Congress