पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:31 IST2021-02-05T06:31:47+5:302021-02-05T06:31:47+5:30
साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा ...

पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा
साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नितीन ओझा व मुकुल कुलकर्णी यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा हा सूडभावनेच्या उद्देशाने दाखल केला असून, हा गुन्हा खोटा आहे. संस्थान व्यवस्थापनाने भक्तांच्या गैरसोयीच्या बातम्या माध्यमाने प्रसिद्ध केल्याचा आकस मनात धरून मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी एक विचाराने खोटी फिर्याद अडीच महिन्यांनंतर दाखल केली आहे. यातून या अधिकाऱ्यांनी न्यायालयीन अधिकारात हस्तक्षेप करून आपले अधिकार प्रशस्त असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. निवेदनावर संघाचे अध्यक्ष शैलेश शिंदे, उपाध्यक्ष योगेश डोखे, सचिव अनिल दीक्षित, संघटक हाफिज शेख, मोबीन खान यांच्या सह्या आहेत.