अल्पवयीन मुलाचा छळ; महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयासह चौघांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:51 IST2020-06-28T20:50:21+5:302020-06-28T20:51:26+5:30
अहमदनगर: अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन मारहाण करत त्याचा छळ करणारे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे व अग्नीशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह महापालिकेतील एक कर्मचारी व सदर अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात अखेर रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

अल्पवयीन मुलाचा छळ; महापालिकेच्या आरोग्य अधिकाºयासह चौघांविरोधात गुन्हा
अहमदनगर: अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन मारहाण करत त्याचा छळ करणारे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ़ अनिल बोरगे व अग्नीशमन विभागाचा प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह महापालिकेतील एक कर्मचारी व सदर अल्पवयीन मुलाची आई यांच्याविरोधात अखेर रविवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलानेच फिर्याद दाखल केली आहे़ महापालिकेतील दोन जबाबदार अधिकाºयांविरोधात गंभीर कलमातंर्गत गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे़ १३ जून रोजी रात्री साडेआकरा वाजता नगर शहरात राहणाºया एका नर्सच्या घरी जाऊन डॉ़ अनिल बोरगे, शंकर मिसाळ व बाळू घाटविसावे यांनी दारु पिऊन आरडाओरड केली़ याबाबत त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी सदर अल्पवयीन मुलास शिविगाळ करत मारहाण केली़ मिसाळ व बोरगे यांनी यावेळी मुलास जिवे मारण्याची धमकी दिली़.
त्यानंतर घाटविसावे याने मुलाचे पाय धरून मिसाळ व बोरगे यांनी मुलास गच्चीवरून खाली ढकलून देण्याचा प्रयत्न केला़ तसेच मिसाळ व बोरगे यांनी तीन महिन्यांपूवीृ घरी येऊन हाताला चटके दिल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी पोलिसांनी बोरगे, मिसाळ, घाटविसावे व सदर मुलाच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला आहे़