लाच मागणा-या पोलिसाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:47 IST2018-09-12T17:47:07+5:302018-09-12T17:47:25+5:30
मोबाईल संदर्भात दाखल गुन्ह्यात सहकार्य केल्याच्या बदल्यात मुलीच्या पित्याला ५ हजार रूपयांची लाच मागणा-या येथील सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आकाश अनिल भैरट

लाच मागणा-या पोलिसाविरुध्द गुन्हा
अहमदनगर : मोबाईल संदर्भात दाखल गुन्ह्यात सहकार्य केल्याच्या बदल्यात मुलीच्या पित्याला ५ हजार रूपयांची लाच मागणा-या येथील सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आकाश अनिल भैरट याच्याविरोधात बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलीस ठाण्यात एका मुलीच्या मोबाईल संदर्भात तक्रार दाखल होती़ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती़