लोणीव्यंकनाथ येथील कोवीड सेंटरला क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची एक लाखाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 10:16 IST2021-05-04T10:15:35+5:302021-05-04T10:16:23+5:30
श्रीगोंदा : चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने लोणीव्यंकनाथ येथे लोकसहभागातून चाललेल्या श्री व्यंकनाथ कोविड सेंटर ...

लोणीव्यंकनाथ येथील कोवीड सेंटरला क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडची एक लाखाची मदत
श्रीगोंदा : चेन्नई सुपर किंग्जचा आघाडीचा फलंदाज ऋतुराज गायकवाड याने लोणीव्यंकनाथ येथे लोकसहभागातून चाललेल्या श्री व्यंकनाथ कोविड सेंटर साठी 1 लाखाची मदत पाठविणार आहे. किर्लोस्कर कंपनीची टीम हया भेट देणार आहे, अशी माहिती लोणीव्यंकनाथचे उपसरपंच मितेश नाहाटा यांनी दिली.
बाळासाहेब नाहाटा यांनी लोणी व्यंकनाथ येथे सुरु केलेले कोविड सेंटर व आॅक्सीजन सिलेंडर पुरवण्यासाठी केलेला उपक्रमाची लोकमतने सर्वप्रथम दखल घेतली. त्यानंतर इंडीया फोब्ज या इंग्रजी नियतकालीकाने दखल घेतली.
त्यावर ऋतुराज गायकवाड याने पुण्यातील एका मित्राच्या मार्फत मितेश नाहाटांशी संपर्क साधला. ग्रामीण भागातील कोविड रुग्णांना जीवनदान देण्यासाठी एक लाखाची मदत जाहीर केली. अन्य खेळाडुंकडून मदत मिळवून देण्यासाठी ऋतुराज गायकवाड मदत करणार असल्याचे समजते. तसेच लोणी व्यंकनाथ येथील कोविड सेंटरला किर्लोस्कर कंपनीची टीमही भेट पाहणी करून मदत करणार असल्याचे समजते.