क्रिकेट स्पर्धेतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:34+5:302021-03-06T04:19:34+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील अशोकनगर जिमखाना येथे सुरू असलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत उपांत्य लढतीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. अंतिम ...

क्रिकेट स्पर्धेतील
श्रीरामपूर : तालुक्यातील अशोकनगर जिमखाना येथे सुरू असलेल्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत उपांत्य लढतीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. अंतिम सामना ७ मार्च रोजी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष भास्करराव खंडागळे, सिद्धार्थ मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत ३१ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेची दुसरी फेरी संपून आता उपांत्यपूर्व फेरीला सुरुवात झाली आहे.
जम्मू, काश्मीर, मुंबई, पुणे, नाशिक, बीड, औरंगाबाद, जालना येथील नामांकित संघात अटीतटीच्या लढती होणार आहेत. प्रेक्षकांना चांगले सामने बघायला मिळत आहेत. स्पर्धा यशस्वितेसाठी मंजुश्री मुरकुटे, सोपान राऊत, प्रा.सुनिता गायकवाड, काशिनाथ गोराणे, निरज मुरकुटे, संयोजक अभिषेक खंडागळे, बापू कोळसे, जुबेर इनामदार, भैय्या शेख, सुधा तावडे, शेखर म्हसे, मुन्ना सय्यद, जमील पठाण, नीलेश कुंदे आदी परिश्रम घेत आहेत.
------