शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:52+5:302021-04-19T04:18:52+5:30
अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात रुग्णांची संख्या देखील अधिक आहे. जिल्ह्यात शासकीय ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा
अहमदनगर जिल्हा हा भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असून या जिल्ह्यात रुग्णांची संख्या देखील अधिक आहे. जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे अनेक रुग्ण उपचारासाठी पुणे, औरंगाबाद व मुंबईस जात असतात. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. नगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले तर अनेक रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे आधुनिक उपचार, नवीन तपासणी यंत्रणेद्वारे अचूक निदान व कर्करोग निदान व इतर आजारांसंबंधी उपचार इत्यादी अनेक सुविधा जिल्ह्यातच प्राप्त होतील.
आजच्या काळात जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असते तर अनेक कोरोना रुग्णांना या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांची हेळसांड थांबली असती. त्यामुळे भविष्यातील धोके लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यात लवकरात लवकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, शिक्षक आघाडी अध्यक्ष भागचंद औताडे, रंगनाथ माने, अरुण थोरात, बाबासाहेब चेडे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, संघटक जालिंदर शेडगे, जिल्हा अध्यक्ष सुभाष दरेकर, नवनाथ ढगे, अविनाश कुरुमकर, युवराज सातपुते, शब्बीर शेख, राहुरी तालुका अध्यक्ष संदीप उंडे, शेखर पवार, सचिन गागरे, श्याम कदम, डिग्रस ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिंगारदे, बाळासाहेब भोर, ऋषीकेश निबे, पप्पू हरिश्चंद्रे, विठ्ठल शेजुळ, अंकुश भोसले, अमित कोल्हे, गोकुळ नेटके, दत्तात्रय काकडे, सुनील कोल्हे, रवींद्र गाडेकर, संतोष मेहेत्रे यांनी केली आहे.