विजेच्या धक्क्याने गाय़, कुत्र्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:16+5:302021-09-02T04:46:16+5:30
जेऊर येथील घटना ; महावितरणचा गलथान कारभार केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बुधवार (दि.१) विजेच्या धक्क्याने गाय व ...

विजेच्या धक्क्याने गाय़, कुत्र्याचा मृत्यू
जेऊर येथील घटना ; महावितरणचा गलथान कारभार
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात बुधवार (दि.१) विजेच्या धक्क्याने गाय व कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
जेऊर येथील म्हस्के वस्तीवर विजेचा खांब पडल्याने तारा मुख्य रस्त्यावर पडल्या होत्या. वर्दळीच्या रस्त्यावर तारा खाली पडून देखील महावितरण कंपनीने तारांमधील विद्युत पुरवठा बंद करण्यास दिरंगाई केली. त्यामुळे विकास सीताराम म्हस्के यांची गाय मृत्युमुखी पडली तर एक कुत्राही विजेच्या धक्क्याने मरण पावला आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाली पडलेल्या तारांमधील विद्युत पुरवठा बंद केल्याचे सांगून घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी रस्त्यावरून जाणारा एक कुत्रा तारेला चिकटून मृत्युमुखी पडला. हा प्रकार विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसमोरच घडला. विद्युतपुरवठा बंद केला होता तर कुत्र्याचा मृत्यू झालाच कसा ? यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दोन दिवसांपासून वीज गायब
जेऊर परिसरातील बहुतांशी भागात दोन दिवसांपासून वीज गायब आहे. शेटे वस्ती, लिगाडे वस्ती व डोंगरगण गावचा परिसरात दोन दिवसांपासून वीज नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. याकडेही विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.