पिंपरी कोलंदर येथे कोविड सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:20 IST2021-05-16T04:20:30+5:302021-05-16T04:20:30+5:30

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथे सत्यशोधक विचार आश्रम कोविड सेंटरचे उद्घाटन सरपंच सोनाली बोबडे यांच्या हस्ते करण्यात ...

Covid Center started at Pimpri Kolander | पिंपरी कोलंदर येथे कोविड सेंटर सुरू

पिंपरी कोलंदर येथे कोविड सेंटर सुरू

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर येथे सत्यशोधक विचार आश्रम कोविड सेंटरचे उद्घाटन सरपंच सोनाली बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थांच्या मदतीने निधी उभारू, तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने या विधायक सामाजिक कार्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत करू, असे आश्वासन यावेळी सरपंच बोबडे यांनी दिले.

पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ.विजय वीर, डॉ.सचिन जगताप, सेवा संस्था अध्यक्ष भाऊसाहेब ओहोळ, दिलीप बोबडे, सुखदेव ओहोळ, गणेश बोबडे, विठ्ठल कोळपे, कबड्डीपटू संकेत दिघे, बाळासाहेब धोत्रे महाराज, भाऊसाहेब वाघ, ग्रामसेवक वामन खाडे, जयसिंग धोत्रे आदी उपस्थित होते.

एका स्तुत्य समाजोपयोगी विधायक उपक्रमास आम्ही सर्वतोपरी साहाय्य करू, अशी ग्वाही उद्योजक अतुल लोखंडे यांनीही दिली. रुग्णांना प्राथमिक उपचार, दोन वेळा चहा, नाश्ता, अंडी, दोन वेळा जेवण, काढा, योग, प्राणायाम आदी सेवा दिल्या जातील, असे सत्यशोधक विचारमंथन आश्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब धोत्रे महाराज यांनी सांगितले.

Web Title: Covid Center started at Pimpri Kolander